तर आज पासून माझं नाव छोटा पप्पू – आदित्य ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू म्हणून केला जात आहे. सत्तार यांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमधील आक्रोश मोर्च्यातून उत्तर दिले आहे. मला छोटा पप्पू म्हंटल्याने जर राज्यातील प्रश्न सुटत असतील तर नक्कीच मला छोटा पप्पू म्हणा असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, माझा उल्लेख अब्दुल सत्तार छोटा पप्पू म्हणून उल्लेख करत आहे. त्यामुळे मला नक्कीच छोटा पप्पू म्हणा,माझा उल्लेख छोटा पप्पू म्हणून करा, पण यातून राज्यातील प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर माझं नाव छोटा पप्पू ठेऊन राज्यातील शेतकरी खुश होणार असतील, माझं नाव छोटा पप्पू ठेवल्याने राज्यात उद्योग येणार असतील तर आज पासून माझं नाव छोटा पप्पू ठेवा मी स्वीकारेल,असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *