पक्षाने सांगितले तर निवडणुकीतून माघार घेईन – मुरजी पटेल

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१३ ऑक्टोबर २०२२


उद्धव ठाकरे गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना त्यांचा पालिका नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. याच कारणामुळे उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांच्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले जात आहे. उमदेवरी अर्जावर खुद्द पटेल यांनीच भूमिका स्पष्ट केली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीविषयी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी पक्षादेश पाळणार आहे. पक्षाने सांगितले तर निवडणुकीतून माघार घेईन, असे मुरजी पटेल यांनी म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *