डेंगीचे रूग्ण वाढताहेत

०८ नोव्हेंबर २०२२

पिपरी


शहरात डेंगी आजाराने डोके वर काढले आहेत . सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ४ हजार ४६८ डेंगी सदृश्य रुग्ण आढळले आहेत . यापैकी २०१ रूग्ण डेंगी बाधित सापडले आहेत . गेल्या तीन महिन्यांची वाढती आकडेवारी पाहता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविल्या जात नसल्याची ओरड होत आहे . दरम्यान , तीन दिवसांपूर्वी खासगी रूग्णालयात शिक्षक तरुणीचा डेंगीमुळे मृत्यू झाला आहे . पण , याची नोंद महापालिका रूग्णालय दप्तरी नसल्याने रुग्णांचा आकडा अधिक असल्याचा शक्यता व्यक्त होत आहे . हवामानातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होऊ लागली आहे . त्यामुळे डेंगी , मलेरिया व काविळीचे रुग्ण आढळत आहेत.

जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत ६ हजार ६४२ डेंगीसदृश्य आढळून आले आहेत . दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील भरलेले कोंडाळे , साचलेल्या गटारी स्वच्छ केला जात नसल्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे . काळेवाडी , नेहरू नगर , अजमेरा कॉलनी , थेरगाव , रहाटणी , आकुर्डी , अशा विविध भागात रूग्ण आढळले आहेत . सप्टेंबर , ऑक्टोबर महिन्यात ३ हजार ९ ८६ रुग्ण डेंगी सदृश आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळले आहे . त्यांच्यापैकी २०१ रूग्णांना डेंगी झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले आहे . जानेवारी महिन्यात दोन रूग्ण सापडले होते . जूनपाठोपाठ १७ , जुलैमध्ये ३७ , ऑगस्टमध्ये ३६ , सप्टेंबरमध्ये ९ ८ , ऑक्टोबरमध्ये ८ ९ आणि नोव्हेंबरमध्ये १४ डेंगी आढळून आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *