रेल्वे प्रशासनाची आडमुठी भूमिका तरीही सकारात्मक मार्ग काढू – उपमुख्यमंत्री अजित पवार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०४ जून २०२२

चिंचवड


घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने आनंदनगर,साईबाबानगर आदी परिसरातील झोपडपट्टीवासीयांवर भारतीय रेल्वे प्रशासनाच्या वतीने कारवाईची टांगती तलवार आहे. या कारवाईबाबत वेगवेगळ्या अफवा व संभ्रम नागरिकांमध्ये आहे. काल दि.३ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी व पक्षाच्या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते.

प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात पवार यांची भेट घेऊन रेल्वेच्या कारवाई बाबत आनंदनगर साईबाबानगर आदी परिसरातील गोरगरीब नागरिक संभ्रम अवस्था निर्माण झाली असून या परिसरातील नागरिक भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. त्यावर अजित पवार यांनी मी यावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून याबाबत रेल्वे प्रशासन आडमुठी भूमिका घेऊन कारवाईवर ठाम आहे. या विषयाबाबत आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांना दिलासा मिळेल असा निर्णय करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. असे पवार यांनी सांगितले. त्याच बरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेमधील ४५० सफाई कामगारांचे वेतन ठेकेदारांनी थकवले आहे. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबीयांना उपासमार व विविध समस्यांना सामोरी जावे लागत आहे. यावर मी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी बोलून तातडीने हे वेतन देण्याच्या सूचना करतो असे पवार यांनी सांगितले.

काल प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात अजित पवार यांच्या गाजलेल्या एक. तास २० मिनिटाच्या भाषणात दोन वेळा मारुती भापकर यांनी आनंदनगर साईबाबानगर आदि रेल्वे प्रशासनाच्या कारवाई बाबत व सफाई कामगारांच्या वेतनाबाबत मला निवेदन दिले आहे. त्यांच्या या मागणीबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जाईल असे जाहीर भाषणात दोन वेळा उल्लेख केला. घर हक्क संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात मारुती भापकर, प्रसाद शेट्टी, मारुती पंद्री, अण्णा कसबे, लक्ष्मी देवकर,ज्योती शिंदे,उषा हनवटे,अनिता भंडारी, अण्णा दानेलो,सतिश बटेलो ,अनिल पद़ी आदि उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *