उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते पोलीस कल्याण उपक्रमातील दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दि.02/07/2021

बातमी – मुख्य संपादक, अतुलसिंह परदेशी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पुणे ग्रामीण जिल्हा मुख्यालयाच्या आवारात पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियम कॉ. लि.च्या वतीने उभारण्यात आलेल्या बाणेर रोड व पाषाण रोड येथील दोन पेट्रोल पंपांचे उद्घाटन झाले…

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक पी.एस. रवी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गृह विभाग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नागरिकांचे मित्र म्हणून भूमिका बजावत असताना त्यांच्याकडून प्रेम व आस्था मिळविण्यासाठी प्रयत्न करा,असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले…

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *