नारायणगाव महाविद्यालयात “राष्ट्रीय गणित दिवस” साजरा

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, ता.जुन्नर येथे गणित विभागातर्फे नुकताच
महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस तथा “राष्ट्रीय गणित दिवस” साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. रसूल जमादार, गणित विभागप्रमुख प्रा. निलेश गावडे, प्रा. वैशाली वाघ, प्रा. अक्षय भोर तसेच प्रथम व द्वितीय वर्ष गणित विषयाचे ९० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्राचार्य डॉ कुलकर्णी यांनी श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनप्रवास थोडक्यात मांडला, त्यांचे मोलाचे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले, डॉ. रसूल जमादार यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या Mock Theta Function ची मदत कॅन्सर उपचारात कशी होते हे सांगितले.
प्रा. वैशाली वाघ यांनी सूत्रसंचलन केले. गणित विभागप्रमुख प्रा. निलेश गावडे यांनी आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *