न्यायालय आवार व परिसरात उधळला जाणाऱ्या गुलालवर आक्षेप

०७ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


येत्या काही दिवसांत पिंपरी ॲडव्होकेट बार असोसिएशनची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीची चुरसदेखील वाढलेली आहे. या निवडणुकीनंतर विजेत्या पॅनेलकडून गुलालाची उधळण केली जाते. यावर हरिश्‍चंद्र सीताराम तोडकर यांनी आक्षेप घेतला आहे. पर्यावरणाला हानी पोचल्याविरोधात आत्मक्लेष आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत तोडकर यांनी पिंपरी पोलिस स्‍टेशन आणि बार असोसिएशन यांनी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीनंतर जो जल्लोष होतो. त्यावेळी उधळला जाणारा गुलाल, भंडार हा नियमबाह्य आहे. न्यायालय आवार व परिसरात गुलाल उधळला जाऊ नये. ज्या न्यायालयात गैर कामाला शिक्षा होते. तेथेच नियम, कायदा मोडला जाणे अपेक्षित नाही. तसे झाल्यास त्या कृतीच्या निषेधार्थ वरिष्ठ सरकारी कार्यालयासमोर आत्मक्लेष वा लाक्षणिक कृती केली जाईल. त्याची दखल घेण्याचे विनंती केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *