भाजपच्या डबल इंजिन लुटीपासून गुजरातला वाचवू – राहुल गांधी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


काँग्रेस दिलेल्या आश्वासनांची निश्चित पूर्तता करेल आणि डबल इंजिनच्या नावाखाली भाजप करत असलेल्या लुटीपासून गुजरातवासीयांना वाचवेल, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी दिले. हिंदीत केलेल्या ‘ट्वीट’मध्ये राहुल यांनी नमूद केले, की काँग्रेसच्या आठ वचनांची काँग्रेस निश्चित पूर्तता करेल. त्यानुसार पाचशे रुपयांत घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर तसेच शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येईल. आम्ही आपल्याला भाजपच्या ‘डबल इंजिन’च्या नावाखाली सुरू असलेल्या लूट-दरोडेखोरीपासून वाचवू. गुजरातमध्ये बदलाचा उत्सव काँग्रेसतर्फे साकारला जाईल व साजरा केला जाईल.

गुजरातमध्ये १ ते ५ डिसेंबरदरम्यान निवडणूक होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येतील. राज्यात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात तिरंगी लढत होत आहे. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण १८२ जागांपैकी भाजपने ९९ तर काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळवला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *