दगडूशेठ मंदिर, शनिवारवाड्याची सुरक्षितता धोक्यात !

०७ नोव्हेंबर २०२२

पुणे


प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि ऐतिहासिक शनिवारवाडा या दोन्ही वास्तूंची सुरक्षितता धोक्यात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे . केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिस यांनी केलेल्या तपासणीत ही बाब आढळून आली आहे . या ठिकाणी घातपाताची शक्यता या यंत्रणांनी व्यक्त केली आहे . पुणे पोलिस आणि भारतीय पुरातत्व यांनी महापालिकेला विभाग पाठविलेल्या पत्रातूनही ही बाब उघड झाली आहे . शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात . त्याचबरोबर ऐतिहासिक शनिवारवाड्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात . या दोन्ही वास्तू एकमेकांपासून अगदी जवळच्या अंतरावर आहेत . मात्र , या दोन्ही वास्तू आता सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे . केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिस यांनी या दोन्हीही वास्तूंच्या सुरक्षिततेसंबंधीची काही महिन्यांपूर्वी तपासणी केली होती . त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *