पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीला अण्णा हजारे यांचा पाठिंबा…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.5/8/2021

पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीला अण्णा हजारे यांचा पाठिंबा

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

राळेगण सिद्धी:- पुणे -नाशिक हायस्पीड रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी राळेगण सिद्धी या ठिकाणी जाऊन पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे बाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना माहिती दिली.यावर माझा तुमच्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे असं आश्वासन अण्णा हजारे यांनी शेतकरी बांधवांना दिले.
या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन त्यांची घरेदारे सुद्धा या रेल्वे मध्ये जात आहे. संपूर्ण क्षेत्र हे बागायती आहे.या आधी तालुक्यामध्ये पाच धरणांमध्ये ,कॅनाल मध्ये, पुणे नाशिक हायवे मध्ये व पोट -चाऱ्या इत्यादी विविध प्रकल्पांसाठी अनेक मोठ्या स्वरूपात भूसंपादन झालेल्या आहे.तसेच अनेक शेतकरी अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक देखील आहे. असं अण्णांना सांगितले, जर ही रेल्वे गेली तर अनेक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊन त्यांच्या उपजीविकेचे फार मोठे संकट निर्माण होणार आहे.लोकांचे पशुधन व पिण्याचे स्रोत हे कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत. शेतकऱ्यांच्या रेल्वेमुळे अनेक अडचणी उभ्या राहणार आहेत, कुकुट पालन (पोल्ट्री ) व दुग्ध व्यवसाय सुद्धा धोक्यात येणार आहे.या वेळेस अण्णांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन कुठलाही प्रकल्प किंवा रेल्वे शासनाला बागायत क्षेत्रातून नेता येत नाही अशी माहिती दिली. जर शासन तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करा. वेळ आली तर शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलनाची सुद्धा तयारी ठेवायची. तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ शकलो असतो परंतु कोरोनामुळे ते शक्य नाही. कोरोना चे प्रमाण कमी झाल्यानंतर मी तुमच्या आंदोलनात सहभागी होईल, तुमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तुमच्या शेतकरी आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे असं आश्वासन यावेळी सर्व शेतकरी बांधवांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *