महापालिकेतर्फे ‘ स्वच्छ वॉर्ड ‘ स्पर्धा

०५ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने क्षेत्रिय कार्यालयस्तरावर स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेमध्ये हॉटेल शाळा , हाउसिंग सोसायट्या , मार्केट असोसिएशन , शासकीय कार्यालये व रुग्णालयांनी सहभागी व्हावे , असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी दि .४ केले आहे . स्वच्छ भारत अभियानअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात येत असून , नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा ऑक्टोबर , नोव्हेंबर व डिसेंबर अशी महिनानिहाय घेण्यात येणार आहे . स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागामध्ये अर्ज सादर करावा . विजेत्यांना कोणत्याही स्वरुपाचे रोख बक्षीस देण्यात येणार नाही . त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे , अशी माहिती स्वच्छ भारत समन्वयक तथा सहायक आयुक्त विनोद जळक यांनी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *