पिंपरी चिंचवड
18/06/2021
रोहीत खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी वर्गाला 3 हजार रुपयांचे अमिष दाखवून सत्ताधा-यांनी त्यांची घोर फसवणूक केली करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर कष्टक-यांना तीन हजाराचे गाजर दाखवले असल्याची फ्लेक्स बाजी माजी आमदार विलास लांडे यांनी केली….
आजच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तीन हजार च्या गाजर मुद्यावरून चांगलाच गदारोळ झाला…
कोवीड 19 च्या या महाभयंकर आजारात गेल्या दोन वर्षांपासून अनेकांच्या हातचे काम गेले आणि वारंवार होणा-या लॉकडाऊन मुळे आर्थिक संकट उभे राहीले… कष्टक-यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 3 हजार रुपये अर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता… महिना उलटला तरी कष्टक-यांना आर्थिक लाभ मिळत नसल्याने माजी आमदार विलास लांडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मदत का दिली जात नाही अशी विचारपूस करत ठरल्या प्रमाणे तीन हजार रूपये कष्टकरी यांना देण्याची मागणी केली… आयुक्तांनी अर्थसहाय देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने लांडे यांनी
तुम्ही असा निर्णय कशाला घेता ? कोणाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला ? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला का ? असा जाब आयुक्तांना विचाराला…
त्यावर कायद्यात बसत नसल्यामुळे हा लाभ देणे शक्य नसल्याचे उत्तर आयुक्तांकडून देण्यात आले…कष्टक-यांची फसवणूक झाली असल्याने लांडे यांनी प्रशासन आणि सत्ताधा-यांवर संताप व्यक्त करत पिंपरी-चिंचवडच्या कानाकोप-यात ‘नागरिकांच्या पैशांवर सत्ताधा-यांची नजर… कष्टकरी जनतेला दाखविले 3 हजाराचे गाजर…’ आता हवा शहराला फक्त घड्याळाचा गजर ! अशा आशयाचे फ्लेक्स संपूर्ण शहरात लावले…
शेवटी तीन हजार रुपये वाटप करण्याच्या आपयशी ठरलेल्या योजनेचे खापर नगरसेवकांनी आयुक्तांच्या माथी फोडले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी देखील जशासतसे उत्तर देऊन लांडे यांच्या फ्लेक्सबाजीचे समर्थन केले.