दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

०५ नोव्हेंबर २०२२

पुणे


फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १५ नोव्हेंबरपर्यंत आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत शाळांमार्फत अर्ज भरता येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेस बसणारे विद्यार्थी, तसेच नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी यांनाही ही सवलत आहे. तसेच नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने ‘www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावे लागतील, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *