तासगाव। महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा..

राजू थोरात तासगाव सांगली जिल्हा प्रतिनिधी

तासगाव ;- येथील संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात “जागतिक लोकसंख्या दिन” ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व दीपप्रज्वलनाने झाली.त्यानंतर स्वप्नाली बचुटे यांनी कार्यक्रमाचा हेतू प्रास्ताविकातून स्पष्ट केला. श्वेता चौधरी, पूजा जाधव व अस्मा जमादार या प्रशिक्षणार्थींनींनी आपले मनोगते सादर केली. त्यानंतर प्रा.डॉ.एम.एस.उभाळे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.
प्रा.डॉ.कुलदीप पाटील(पी.व्ही.डी.टी.कॉलेज तासगाव) यांनी “लोकसंख्या आणि कोव्हीड समस्या” या विषयावर आपले अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. यात त्यांनी लोकसंख्या दिन साजरा करण्याचे औचित्य, जागतिक स्तरावरील लोकसंख्यावाढ, भारतातील लोकसंख्यावाढ, त्या अनुषंगाने महिलांचे आरोग्य,लोकसंख्या वाढीचा आणि कोव्हीड यांचा संबंध अशा विविध मुद्यांवर सविस्तर विवेचन केले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केले. तेजश्री गुरव यांनी आभार अभिव्यक्ती तर गौरी हंकारे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एम.एस.उभाळे,प्रा.डॉ.ए.टी.पाटील,प्रा.सौ.प्रभा घोरपडे, प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे व प्रा.डॉ. अर्चना चिखलीकर यांनी प्रयत्न केले.तर श्री.एस.एस.महाडीक, श्री.एस.आर.कुंभार,श्री.शशिकांत कोठावळे व श्री.वाघमारे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *