अजित पवार युती सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागतच – रामदास आठवले

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२


रामदास आठले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्ष नेते अजित पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कॉपी करत राहुल गांधी पावसात भिजले तरी काँग्रेसला भिजवण्याची ताकद त्यांच्यात नाही, अशी घणाघातील टीका आठवले यांनी केली. अजित पवारांना पहाटेची शपथ घेण्याची सवय आहे. कदाचित अजित पवार युती सरकार मध्ये येत असतील.

अजित पवार आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे रामदास आठवले म्हणाले. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्याचं एकनाथ शिंदे यांच्यात सामर्थ्य आहे. टपरीवाले असे हिनवल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटलांनी शिवसेनेला चुना लावल्याचेही आठवले म्हणाले.