१० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे परिसर हादरला

०४ नोव्हेंबर २०२२

पुणे


वडगाव शेरीतील सोपाननगर येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीमुळे येथील दहा सिलिंडरचे स्फोटही झाले. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण वडगाव शेरीचा परिसर हादरला आणि आग आणखी भडकली. अग्निशामक दलाचे सहा बंब आणि १८ टँकरच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनी तब्बल चार तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

सोपाननगर भागात शुभम गार्डन सोसायटीशेजारी हे भंगारचे गोदाम होते. चारही बाजूंना पत्रा मारून भंगाराचा मोठा ढीग येथे साठवण्यात आला होता. सकाळी साडेअकराच्या वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाला समजल्यानंतर येरवडा, धानोरी, नायडू, वाघोली, हडपसर भागातील केंद्रांवरून सहा बंब आणि चार टँकर मागवण्यात आले. तसेच परिसरातील १४ खासगी टँकर मदतीला घेण्यात आले. आग मोठी असल्याने ती विजवण्यासाठी ६० टँकर पाणी लागले. नगरस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी, नामदेव बजबळकर, कनिष्ठ अभियंता नितीन जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे, बांधकाम निरीक्षक फारूक पटेल, बांधकाम निरीक्षक एकनाथ गाडेकर या अधिकाऱ्यांनी आग नियंत्रणासाठी सहकार्य केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *