पुणे जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मंजुरी

०४ नोव्हेंबर २०२२

पुणे


पुणे जिल्ह्याच्या चालू आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक आराखड्यातील सुमारे ३०३ कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरु करण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता.३) मंजुरी दिली. ही सर्व विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असा आदेश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिला. यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्यावतीने केल्या जाणाऱ्या आणि निधीअभावी रखडलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यातील विकासकामांना मंजुरी देण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतलीय या बैठकीत या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *