पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई, दिवाळीत आकारला ३६ लाखांचा दंड

०३ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दिवाळीत खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने वाहतुकीचा काही ठिकाणी खोळंबा झाला . वाहनचालकांमुळे यात बेशिस्त भर पडली . अशा बेशिस्त चालकांना पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दिला . दिवाळीच्या ४३६४ दणका काळात आठवडाभरात वाहनचालकांवर कारवाई करून ३६ लाख १४ हजार ४५० रुपयांचा दंड आकारला.

दिवाळी कोरोना महामारीनंतर निर्बंधमुक्त साजरी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीला पसंती दिली . त्यामुळे शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या काळात मोठी गर्दी झाली होती . त्यामुळे पिंपरी येथील मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीत बदल केला होता . मात्र , तरीही बेशिस्त वाहनचालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले.खरेदीसाठी आले विनाहेल्मेट दिवाळी खरेदीसाठी गर्दी असल्याने अनेकांनी चारचाकीऐवजी दुचाकीवरून बाजारपेठ गाठली . मात्र , यातील बहुतांश दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्याचे दिसून आले . अशा विनाहेल्मेट असलेल्या ४०६ दुचाकीस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *