जॅकवेल व पंप हाऊससाठी २२ कोटींचा वाढीव निधी

०३ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


भामा आसखेड प्रकल्पातून पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणी आणण्यात येणार आहे . त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जॅकवेल व पंप हाऊसच्या खर्चात २२ कोटी रुपयांची होईल . कामाची अंदाजपत्रकीय तरतूद १५० कोटी रुपये होती . त्यामध्ये आता आणखी २२ कोटी रुपयांची वाढ केली आहे . वाढ मूळ आसखेड महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात भामा प्रकल्पांतर्गत जॅकवेल व पंप हाऊस बांधण्याच्या कामांचा समावेश आहे . कामाचे नाव अपुऱ्या स्वरूपाचे आहे . तसेच या कामास अंदाजपत्रकीय रक्कम कमी आहे . त्यामुळे कामाच्या नावात बदल केला आहे . या कामाची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम १५० कोटी रुपये इतकी आहे . वस्तू व सेवा कर १८ टक्के , सल्लागाराची फी ५ टक्के व १० वर्षे देखभाल दुरुस्ती करणे याचा अंतर्भाव आहे . नवीन दरसूचीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे कारण देत अंदाजपत्रकीय रकमेमध्ये वाढ केली आहे . कामाची मूळ रक्कम १५० कोटी होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *