टेंपो मधील कोंबड्या चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी 
०५ एप्रिल २०२२

कामशेत


कामशेत पोलीस स्टेशनं हद्दीत पोलेट्री व्यवसाय करणाऱ्या एका टेंपोला अज्ञात इसमांनी बुलेट गाडी आडवी लावून चालकाला मारहाण करून व वाहकाला कोयत्याचा धाक दाखवून टेंपो मधील कोंबड्या आणि जवळ असलेले मोबाईल असा एकूण १२,३०,०००रुपयांचा ऐवज लुटला असल्याची फिर्याद कामशेत पोलीस स्टेशनंला दाखल करण्यात आली होती.

या गुन्ह्यात पोलेट्री व्यवसायातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असल्यामुळे पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सूचना केल्यानंतर शेळके यांनी योग्य दिशेने तपास करत तपासाची चक्रे हलवील्यानंतर वैभव विद्याधर सरोदे उर्फ होगाडे याला पैशाची गरज असल्यामुळे सदर चा गुन्हा केला असल्याची माहिती मिळताच सरोदे याला ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखविल्यानंतर त्याचे साथीदार रॉकी मोंटू शेख, सुखउद्दीन जलालुद्दीन शेख, देविदास संतोष काकडे, वैभव लक्ष्मण कांबळे,वैभव विद्याधर सरोदे उर्फ होगाडे यांच्या मदतीने सदर चा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्या नंतर या सर्वांना ताब्यात घेतले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके लोणावळा पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक जगताप शिवाजी ननवरे, शब्बीर पठाण, प्रकाश वाघमारे,राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे,धीरज जाधव,प्राण येवले, दगडू विरकर,पूनम गुंड यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *