कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारायची पण हिम्मत आहे – रवी राणा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२


रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर या दोघांमधील वाद पेटला होता. या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती त्यानंतर रवी राणा यांनी कडू यांची माफी मागीतली होती. मात्र राणा यांनी केलेल्या नवीन वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याची शक्यता आहे.

राणा म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे मी स्वतःच हा वाद मिटवला आहे. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही. हा बच्चू कडू तर काहीच नाही. तो दम देऊन बोलत असेल तर मी जशास तसे उत्तर देईल. प्रेमाच्या भाषेत रवी राणा एकदा नाही दहादा झुकेल. पण कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारायची पण हिम्मत आहे अशे रवी राणा म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *