राजू थोरात
तासगाव प्रतिनिधी
तासगांव नगरपरिषदेकडून मास्क वापरत नाही त्यांच्या दंडात्मक कारवाई चालु केली आहे.त्यासाठी स्वता मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील रस्त्यावर उतरले आहेत.
तासगांव नगरपरिषदेकडून शहरामध्ये दि. 25/11/2020 रोजी मास्क न वापरणे व सोशल डिस्टसिंग
पालन न करणा-या 31 नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरात वंदे मातरम चौक, दुर्गामाता चौक,एस. टी. स्टैंड चौक, शिवतीर्थ चोक, सोमवार पेठ या परिसरात मास्क न वापरणे, सोशल डिस्टसिंग पालन न
करणा-या नागरीकाविरोधात व दुकानांवर कारवाई करण्यात आली. तासगांव नगरपरिषदेकडून नागरीकांना व
दुकानदारांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टसिंग पाळणेबाबत सूचना देण्यात आल्या. तासगांव
शहरात विनामारक वावरण्याची कोणालाही परवानगी नाही. तसेच बाहेरगावाहून तासगांवमध्ये येणा-या सर्व
लोकांनी मास्क घातल्याशिवाय तासगांव शहरात प्रवेश करु नये तसे विनामास्क कोणी आढळून आल्यास
त्याविरोधात कठोरात कठोर भूमिका नगरपरिषद घेणार असल्याचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी नमूद
केले आहे.
यावेळी कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली धनश्री
पाटील (कर निरीक्षक), संकेत हाळीकर (सहा. नगर रचनाकार), प्रियांका भोसले (आस्थापना विभाग प्रमुख),
आशपाक बागवान (लेखापाल), चेतनकुमार माळी (पा.पु. अभियंता), प्रशांत भोसले (संगणक अभियंता), आयुब
मणेर, राजेंद्र काळे, राजेंद्र माळी, महादेव लुगडे, अनिल कोळी, संजय सुर्यवंशी, प्रताप घाटगे, स्वप्निल औताडे,
केलास खटावकर, संतोष गायकवाड, दिपक पवार, दिपक स्वामी, प्रकाश बनसोडे, सुधीर जाधव, प्रविण धाबुगडे,
वैभव गेजगे, अश्विन कोकणे, सिन्नू म्हेत्तर इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.