नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या शिवशाही बसला आग

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२


नाशिक पुणे महामार्गावर चालत्या बसने पेट घेतला. नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे शिवशाही बसने पेट घेतला. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. नाशिकहून ही बस पुण्याला जात होती. पण अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे लगेच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली.

प्रवासी खाली उतरल्यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला. बघता बघता बसला भीषण आग लागली. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूने वाहनं थांबवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सिन्नर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. बसमध्ये एकूण ४२ प्रवाशी होते. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे. मात्र, या दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *