इंग्लंडसमोर श्रीलंकेचे १४२ धावांचे आव्हान

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


T-20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार आहे. श्रीलंका यापूर्वी सेमीफायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. आज इंग्लंड संघाने सामना जिंकल्यास हा संघ सेमीफायनमध्ये धडक मारेल. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.श्रीलंकेने पहिल्या तीन षटकांमध्ये ३२ धावा फटकावत दमदार सुरुवात केली. मात्र चौथ्या षटकामध्ये १८ धावांवर खेळणाऱ्या कुसल मेडिंस याला लियाम लिविंगस्टोन याने तंबूत धाडले. सहा षटकानंतर श्रीलंकेने १ गडी गमावत ५४ धावा केल्या आहेत. यानंतर नवव्या षटकामध्ये ९ धावांवर धनंजया डीसिल्वा याला सॅम करनने आऊट केले. दहा षटकामध्ये श्रीलंकेने २ गडी गमावत ८० धावा केल्या आहेत. एका बाजुला पथुम निसांका उत्कष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत असताना ११ व्या षटकात ८ धावांवर खेळणाऱ्या चरित असलंका याला बेन स्टोक्सने बाद केले. ११ षटकामध्ये श्रीलंकेने ३ गडी गमावत ८४ धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने इंग्लंडसमोर १४२ धावांचे आव्हान ठेवले आहे. ८ गडी गमावत श्रीलंकेने १४१ धावा केल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *