राज्यात ९७ टक्क्यांहून अधिक लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचे लसीकरण पूर्ण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२


महाराष्ट्र राज्यात 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 1 लाख ७२ हजार ५२८ जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. या बाधित जनावरांपैकी १ लाख १२ हजार जनावरे बरी झाली आहे. तर आत्तापर्यंत राज्यात ९७ टक्क्यांहून अधिक जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे.

दिवसेंदिवस राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राज्यातील ३३ जिल्ह्यांतील एकूण ३ हजार २०४ गावांमध्ये या लम्पी स्कीनच्या विषाणूचा प्रभाव दिसून आला आहे. बाधित गावातील एकूण १ लाख ७२ हजार ५२८ बाधित जनावरांपैकी १ लाख १२ हजार ६८३ जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. बाधित जनावरांवर सध्या उपचार सुरु आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *