एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत; नितेश राणेंचं वक्तव्य

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२


भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत, असं वक्तव्य केलं आहे. कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नितेश राणे उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, मी सगळ्या पोलीस खात्याला दोष देत नाही. सगळे पोलीस तसे नसतात, पण काही मोजके जे नालायक आहेत त्यांना तर शिक्षा मिळणारच हा शब्द मी तुम्हाला देतो. मात्र, सगळ्याच पोलिसांना जे बोललं जातंय ते चुकीचं आहे. आज राज्यात हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. आज राज्याचा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रीफ मंत्री नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा सत्कार व्हायला हे मविआ सरकार नाही.

तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा. एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत.त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणं गरजेचं आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *