शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट – आदित्य ठाकरे

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२८ ऑक्टोबर २०२२

ओतूर


राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा असे आवाहन राज्यांचे माजी पर्यटनमंत्री, पर्यावरण व युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी वडगाव आनंद या ठिकाणी केले. वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील दशरथ लक्ष्मण केदारी यांणी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून कर्ज बाजाराला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या कुटुंबातील परीवारास राज्याचे माजी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री व शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट दिली असता यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले की सध्या शेतकऱ्यांशी परिस्थिती अतीशय बिकट असुन आतापर्यत बांधावर कोणीही गेलेले नसुन अजुन झालेल्या नुकसानीचा एकही पैसा मिळाला नसुन कुठलेही राजकरण न करता भरपाई द्यावी अशी मागणी केली. उपसभापती गो-हे म्हणाले की कांद्याचा प्रश्न गेली २५ ते ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असुन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दौरा करणार आहे. तसेच या ठिकाणी केदारी यांच्या कुटुंबाला शिवसेना पक्षाने मदत केली असुन संबंधित कुटुंबातील मुलांचा शिक्षणाचा खर्च पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे असे सांगितले.

याप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती डॉ.निलम गो-हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख संभाजी तांबे, शिवसेना तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, मंगेश आण्णा काकडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, दिलीप डुंबरे, पंचायत समितीचे सदस्य जिवन शिंदे, कैलास वाळुंज, सचिन वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *