नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका ककरत आहेत. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला मिळालेले निवडणूक चिन्ह मशाल नसून तो आईसक्रीमचा कोन आहे, असे विधान केले आहे. राणेंच्या या विधानावर उद्धव ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रविंद्र वायकर यांनी वास्तव सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले चिन्ह हे मशाल आहे. त्यांच्या निवडणूक चिन्हाबद्दल लोक ढाल कोणाची आणि तलवार कोणाची, असे म्हणत आहेत. मात्र आम्हाला मिळालेले मशाल हे निवडणूक चिन्ह शिवसेनेचेच होते. हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेले आहे. तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का? तुम्ही भारतीय नागरिक म्हणून योग्य आहात का? असे सवाल किशोरी पेडणेकर यांनी केले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *