बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात झाला प्रवेश…
मुंबई दि. १६ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंगचे प्रमाण वाढले असून परभणी जिल्ह्यातील माजी आमदार सिताराम घनदाट यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार बाबाजानी दुर्राणी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, चिटणीस संजय बोरगे , युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण माजी आमदार विजय भांबळे आदी उपस्थित होते.
गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य परभणी व अभ्युदय बँकचे संचालक भरत घनदाट , माधव ठवरे, लालया पठाण, अमित घनदाट, गणेश काळे, गौतम हत्तीअंबिरे, मधुसूदन लापटे, चेअरमन जाधव, विनायक राठोड, दत्ताराव भोसले, दयानंद कदम, तुळशीराम शिंदे, विठ्ठल टोपे, डी. के. पाटील, विजयकुमार शिंदे, रावसाहेब शिंदे, शेखभाई चाऊस, शेख मुस्ताफा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले.