आळंदी रायगड पालखी सोहळा समिती महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा २०२१

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ ऑक्टोबर २०२१

आळंदी


रविवार दि २४ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मराज संभाजी महाराज्यांच्या आदर्श जीवनावर आधारित घराघरात व मनामना पर्यंत शिवशंभु वरील चरित्र पोहचवावे या हेतूने आळंदी रायगड पालखी सोहळा समितीने महाराष्ट्रात ऐतिहासिक लेखी परीक्षेचे आयोजन केले आहे. याअगोदरही आयोजन केले होते परंतु कोरोना महामारी च्या संकटात नियोजित 3 सप्टेंबर ची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. पण आता शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार चार सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व शाळा पूर्ववत झालेले आहेत समितीद्वारे कोरोना चे सर्व नियम पाळून २४ ऑक्टोंबर ला रविवारी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे.

.

आळंदी रायगड पालखी सोहळा समिती महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा २०२१

संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास शंभरच्यावर परीक्षा केंद्रांवर ३६ जिल्ह्यात एकाच वेळेस परीक्षा पार पडणार आहे. सदरील परीक्षा ऑफलाईन होणार असून, परीक्षेत बसलेले प्रत्येक परीक्षार्थी सांस्कृतिक पोशाख परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर आधारित प्रश्नपत्रिका सोडवणार आहेत.सदर परीक्षा स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान मधील समिती च्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांच्या नियोजनाखाली होणार आहे. आळंदी रायगड पालखी सोहळा समिती महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवशाहीर आकाश दादा भोंडवे पाटील तसेच श्री राज तपसे यांनी परीक्षेस बसलेल्या सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *