रोटरी क्लब च्या वतीने दिपोत्सव साजरा
२६ ऑक्टोबर २०२२
रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या वतीने श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ दिपोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना काळात दोन वर्ष सर्वच सणांवर निर्बंध होते. त्यामुळे कोणताच सण उत्साहात साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र सर्वच सण उत्साहात पार पडले आणि आता दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय.

रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या माध्यमातुन एक दिवा आपल्या राजांसाठी या उपक्रमाअंतर्गत दिपोत्सव साजरा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच जुन्नर शहरातील गरीब व गरजू कुटुंबांना फराळ वाटप देखील क्लब च्या वतीने करण्यात आले.यावेळी जुन्नर चे नायब तहसिलदार सचिन मुंढे ,रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष अतुल परदेशी, सचिव चेतन शहा,विनायक कर्पे, तुषार लाहोरकर,पवन गाडेकर, धनंजय राजूरकर, सुनिल जाधव, डॉ.अमोल पुंडे, नितीन माळवदकर, हितेंद्र गांधी, भोसले सर, भाऊ कुंभार, राजेश डोके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.