कोकण मराठी साहित्यधारा कवीकट्टा, महाराष्ट्र राज्य साहित्यिक संस्थेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मंचरचे ज्येष्ट साहित्यिक मा. मोहम्मदशकील ताजमोहम्मद जाफरी यांची निवड

प्रतिनिधी :- मंगेश शेळके 

दि.११ जून २०२३ (ओझर) :- कोकण मराठी साहित्यधारा कवीकट्टा, महाराष्ट्र राज्य साहित्यिक संस्थेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मंचरचे ज्येष्ट साहित्यिक मा. मोहम्मदशकील ताजमोहम्मद जाफरी यांची निवड करण्यात आली आहे. मा. शकील जाफरी हे सामाजिक कार्यकर्त्या, जादुगार, व्याखाते, बहुभाषिक कवी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.
मराठी साहित्य सेवेचा उद्देश आणि नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उदात्त हेतूने मा. सुनिल सुरेखा आणि मा. रिया पवार यांच्या संकल्पनेतून दि.२२-०९-२०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या कोकण मराठी साहित्यधारा कवीकट्टा, रत्नागिरी महाराष्ट्र या समूहात आजवर किमान १००० च्या वर सदस्य संख्या असून रत्नागिरी जिल्ह्या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रभर संस्थेचे कार्य सुरु आहे.
पुणे जिल्हा इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. मा.शब्दस्वरा मंगरूळकर (अध्यक्ष) पुणे, मा. मंदा पवार (उपाध्यक्ष) आटोळे, मा. सरिता कलढोणे (सचिव) जुन्नर, मा. देवयानी विठ्ठल गवळी (सहसचिव) भोसरी, मा. हनुमंत विश्वनाथ वरे (कोषाध्यक्ष) शिरूर, मा.अरविंद रंगनाथ पंडित (जिल्हा संपर्क प्रमुख) जुन्नर, मा. अल्पेश शांताराम सोनवणे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) जुन्नर असं आहे.
मा. मोहम्मदशकील ताजमोहम्मद जाफरी आणि इतर पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन मा.सुनिलजी सुरेखा (मुख्य संस्थापक), मा.रिया पवार (मुख्य समूह प्रशासक), मा. सुशिल शिर्के सर (समूह प्रशासक), मा.डॉ. सुरेशजी कुराडे (विश्वस्त), मा. डॉ. मारुतीजी कांबळे (विश्वस्त) आदींनी पत्राद्वारे केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *