आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 29 हजार कांदा पिशव्यांची आवक

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१७ ऑक्टोबर २०२२

आळेफाटा


कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत दुय्यम बाजार आवार आळेफाटा येथे रविवार दिनांक 16 रोजी 29 हजार 450 कांदा पिशव्यांची आवक झाली. यामध्ये गोळे कांदा नंबर १ प्रति दहा किलोसाठी 240 ते 275 रुपये, सुपर कांदा नंबर २, 190 ते 240,हलके कांदा 150 ते 210, रुपये, तीन नंबरला 110 ते 180 रुपये, गोल्टी कांदा नंबर चार 50 ते 110 रुपये,तर बदला व चिंगळी कांदा नंबर 5, 70 ते 120 रुपये असा बाजार मिळाला.

 

कांदा चाळीमध्ये कांदा पावसामुळे खराब होत असल्याने बळीराजा आता तो मार्केटमध्ये नेऊ लागला आहे परंतु बाजार भाव कमी असल्याने उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. यंदा झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांदा चाळीमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे सणासुदीला कांद्याचे पैसे होतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात 30 ते 40 टक्के चाळीतील कांदा पावसामुळे खराब झाला आहे. भाव वाढेल या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला.परंतु चांगला भाव नसल्याने बळीराजा हातात झाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *