राजुरीत २० मेंढ्यांचा मृत्यू

रामदास सांगळे
विभागीय संपादक, जुन्नर
१८ जुलै २०२२

राजुरी


राजुरी या ठिकाणी विषबाधा होऊन मेंढपाळांच्या २० मेंढ्या मुत्यूमुखी पडल्याची घटना सोमवार (दि.१८) पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील दावलमलिक बाबांच्या डोंगरांपाशी असलेल्या  माळरानावर लक्ष्मण सोमा कोकरे व रामा तुकाराम कोकरे या मेंढपाळांचा वाडा असुन रविवार दि.१७ पासुन या दोन मेंढपाळांच्या काही मेंढया मुत्यमुखी पडल्या होत्या.

आज पुन्हा सकाळच्या सुमारास काही मेंढया मरण पावल्या याबाबत त्यांणी लगेच गावातील वैद्यकीय अधिकारी श्रीरंग बढे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर अश्या दोन्हीही मेंढपाळांच्या २० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच अजुन काही मेंढयांणा अस्वस्थ वाटत असुन त्यांच्यावर उपचार चालु आहे घटनास्थळी जिल्हा परीषदेच्या सदस्या आशा बुचके, तालुक्याचे बि.डी.ओ हेमंत गरीबे, रमेश काका औटी भेट दिली तर तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.महेश शेजाळ, तालुका पशुवैद्यकिय वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश शेजाळ ,डॉ.मंगेश खिल्लारी ,डाॅ.शुभम राणे, डाॅ.श्रीरंग बढे यांणी ज्या मेंढयांवर उपचार करत असुन मुत्यूमुखी पडलेल्या मेंढयांचे शवविच्छेदन करून अहवाल पुढे पाठवला आहे.

दरम्यान सहा सात महीण्यापुर्वी अवकाळी पावसाने तालुक्यात तसेच विशेष करून राजुरी या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या मेंढपाळांच्या सुमारे २०० ते २५० मेंढ्या मरण पावल्या होत्या त्यांणा अजुन पर्यत भरपाई मिळालेली नसल्याने ती भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी उपस्थित मेंढपाळांणी यावेळी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *