पुणे जिल्ह्यात लम्पी स्किनचा प्रादुर्भाव वाढला

१५ ऑक्टोबर २०२२

पुणे


पुणे जिल्ह्यात लम्पी स्किनचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे आत्तापर्यंत 184 जनावरांचा त्यात मृत्यू झालाआहे. तर 4 हजार 223 जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शासनाकडून मृत जनावरांसाठी पशुपालकांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 128 जणांना मदत दिल्याची माहिती जिल्हा शुसंवर्धनअधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली. जिल्ह्यामध्ये 8 लाख 11 हजार 103 जनावरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाकडे आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 7 लाख 95 हजार 160 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

लसीकरणासाठी पथके तयार करण्यात आली असून या पथकांकडून जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जात आहे. सध्या लम्पी स्किनची बाधा झालेली 71 जनावरे गंभीर आहेत. तर 3 हजार 141 जनावरे आजारातून बरी झाली आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *