जुन्नर तालुक्यात राजकीय भूकंप होणार…जिल्हा परिषद सदस्या सौ.आशाताई बुचके लवकरच होणार कमळमय…

किरण वाजगे
कार्यकारी संपादक

जिल्हा परिषदेमध्ये सतत चार वेळा भरघोस मतांनी निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश निश्चित झाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले…

पुणे जिल्ह्य़ात शिवसेनेची वाघीण अशी ओळख असणा-या आशाताई बुचके ह्या लवकरच भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहीती आपला आवाज न्यूज नेटवर्क ला समजली आहे…
       2009 तसेच 2014 या दोन विधानसभा निवडणुका शिवसेना पक्षाकडून लढलेल्या आशाताई बुचके यांची 2019 विधानसभा निवडणूक आधीच शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती…तरीही 2019 विधानसभा निवडणुक अपक्ष लढवत आशाताई बुचके यांनी तीन नंबरची मत घेत आपली ताकद दाखवून दिली…
   सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.पुढील निवडूनका जागा वाटप जर विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहे त्या पद्धतीने जर झाले तर शिवसेना पक्षाची घरवापसी करूनही फायदा होणार नाही कारण जागा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस ला सुटेल हे धोरण लक्षात ठेवूनच आशाताई बुचके यांनी हा निर्णय घेतला असणार यात काही शंका नाही…
   पुणे जिल्ह्य़ात शिवसेना पक्षात वाघीण म्हणून ओळख असणा-या आशाताई बुचके ह्या तश्या मुळच्या भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंढे तसेच नितीन गडकरी यांच्या खास समर्थक आणि कार्यकर्त्या होत्या…
शिवसेनेत घरवापसी न करता भारतीय जनता पार्टी च्या आपल्या मुळ घरात आशाताई बुचके यांचा लवकरच प्रवेश होणार असल्याने जुन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टी ची ताकद वाढणार आहे…
याविषयी आशाताई बुचके यांना विचारले असता त्यांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला असून लवकरच मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *