हिवाळी अधिवेशनाचा आज ९ वा दिवस, अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार

२९ डिसेंबर २०२२

नागपुर


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज ९ वा दिवस आहे. आजच्या दिवशी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. दरम्यान, आजही विरोधक विविध मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, काल सभागृहात विविध विषयांवर चर्चा झाली.

गायरान जमीन प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झाले आहेत. या आरोपांना सत्तारांनी सभागृहात उत्तर दिले. तसेच महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ हे विधानसभेत बहुमताने संमत झाले आहे. लोकायुक्त विधेयक विधीमंडळात ठेवण्यात आले होते. काल हे विधेयक बहुमतानं मंजुर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *