शिंदे गटाच्या ‘ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘ढाल-तलवार’ या चिन्हाला शीख समाजाने विरोध दर्शवला आहे. हे चिन्ह शीख समाजाचं प्रतिक असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला आहे. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे माजी सदस्य रणजीत कामठेकर यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. हे चिन्ह शिंदे गटाला देऊ नये, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. ‘ढाल-तलवार’ हे धार्मिक चिन्ह आहे. या चिन्हाची पूजा पाचही तख्तांवर केली जाते, असे कामठेकर यांनी म्हटले आहे.

धार्मिक चिन्ह असल्यामुळे ज्याप्रमाणे ‘त्रिशुळ’ या चिन्हाला बाद ठरवण्यात आलं, त्याचप्रमाणे ‘ढाल-तलवार’ या चिन्हालाही रद्द करण्यात यावं, अशी मागणी कामठेकरांनी केली आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *