पुणे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार गौतम चाबुकस्वार

पिंपरी  : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून  पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून तसे प्रसिद्धीपत्रक पाठविण्यात आले आहे.

चाबुकस्वार २०१४ ते २०१९ या काळात पिंपरीचे आमदार होते.  पिंपरी-चिंचवड शहराचे उपमहापौर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तथापि, मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उद्धव सेनेत राहण्याऐवजी शिंदे सेनेत जाणे पसंत केले आहे. हे २ मातब्बर नेते शिंदे सेनेबरोबर गेले असल्याने शहरातील सामान्य शिवसैनिकांची मोठी अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतलेल्या गौतम चाबुकस्वार यांना शेवटच्या फ़ळीतील शिवसैनिकांना बळ देऊन आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी चाबुकस्वार यांना  प्रयत्न करावे लागणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *