गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने सन्मानित झालेल्या शहरातील गुणवंत कामगारांचा सत्कार

पिंपरी-चिंचवड प्रतिनीधी
13/02/2021

गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्षा डाँ.भारतीताई चव्हाण यांच्या निवासस्थानी शुक्रवार दि.१२फेब्रुवारी २०२१ रोजी सदर कार्यक्रम संपन्न झाला…

_संस्थापक अध्यक्षा व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या डाँ.भारतीताई चव्हाण यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली कार्यकारीणी सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन ९ फेब्रुवारी चा पुरस्कार वितरण सोहळा घेणे बाबत व पुरस्काराची रक्कम वाढविणेबाबत केलेल्या श्रमाचे चीज झाल्याची भावना सत्कार स्विकारतांना पुरस्कारार्थींनी व्यक्त केली.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नवनियुक्त गुणवंत कामगारांना गुलाबपुष्प व अभिनंदन पत्रासह पेढा भरवुन सत्कार करणेत आला औद्योगिक कारखान्यात काम करतांना नोकरी व्यवसाय सांभाळून सामाजिक ,सांस्कृतिक शैक्षणिक, साहित्यिक व क्रिडा क्षेत्रातील कामाची दखल घेऊन १ मे कामगार दिनी या सर्व गुणवंताना त्यांच्या कुटुंबियांसमवेत स्मृतिचिन्ह देऊन कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे जाहीर केले.

या प्रसंगी पुरस्कार प्राप्त गुणवंत कामगार_
श्री विकास कोरे किर्लोस्कर आँ.इंजिन
श्री बाळकृष्ण गोपाळे वनाज
श्री संजय साळुंखे लोकमान्य हाँस्पिटल
श्री महेश मेस्री टाटा मोटर्स
श्री हणमंत माळी टाटा मोटर्स
श्री संदिप पानसरे महिन्दा सी एस
श्री दत्ता अवसरकर टाटा मोटर्स
श्री इस्माईल मुल्ला टाटा मोटर्स
सौ.संगिता जोगदंड संभाजी अर्बन बँक
श्री शंकर नाणेकर महीन्द्रा सी आय
श्री राकेश सावंत वनाज
यांचे अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे राज्यस्तरीय सदस्य
श्री तानाजी एकोंडे उपाध्यक्ष
श्री राजेश हजारे सचिव
श्री भरत शिंदे खजिनदार
श्री गोरखनाथ वाघमारे सहखजिनदार
श्री श्रीकांत जोगदंड का.सदस्य
श्री बशिर मुलाणी पि.चि.शहराध्यक्ष
श्री महादेव धर्मेपुणे शहराध्यक्ष
कार्यकारीणी सदस्य श्री भरत बारी
श्री आण्णा गुरव,श्री चंद्रकांत लव्हाटे
श्री अर्जुन सरतापे,श्री अशोक यादव
श्री ऊद्धव कुंभार,व श्री.लक्ष्मण इंगवले
श्री चंद्रकांत पाटील व श्री काळुराम लांडगे

सुनील साबाजी कुटे
कृष्णा ढोकले हापकीन पिंपरी इ.ऊपस्थित होते.