येत्या दोन दिवसांत कोण खोके घेतं याचा खुलासा करणार – दीपक केसरकर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष अंधेरी पोटनिवडणुकीमुळे आणखी तीव्र होताना दिसून येत आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. शुक्रवारी भाजपाचे उमेवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे गटातील काही समर्थकांनी गद्दार, ५० खोके एकदम ओक्के अशी घोषणाबाजी केली. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दोन दिवसांत कोण खोके घेतं याचा खुलासा करणार असल्याचा इशारा दिला आहे.

दीपक केसरकर म्हणाले,आज राज्यात ज्याप्रकारे आरोप केले जात आहेत किंवा घोषणाबाजी केली जात आहे, ती योग्य नाही. ही महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती नाही. येत्या दोन दिवसांत मी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर देणार आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला चांगले कोण आणि वाईट कोण हे कळेल. कोण खोके घेतं आणि आपल्या विराचांसाठी लढा कोण देतं, हे महाराष्ट्राला माहिती झालं पाहिजे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *