नारायणगाव येथे माळी समाजाचा भव्य वधू वर मेळावा

पवन गाडेकर
निवासी संपादक
१५ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका, अखिल भारतीय समता परिषद जुन्नर तालुका, महात्मा फुले ब्रिगेड जुन्नर तालुका, संत सावता माळी संघ जुन्नर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी कलासागर मंगल कार्यालय नारायणगाव तालुका जुन्नर येथे सकाळी ०९ ते ०५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे हे दहावे वर्ष आहे. या मेळाव्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक हरी नरके, माजी आयुक्त महेश झगडे, यवतमाळ चे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, पंचायत समिती जुन्नर चे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन अनेकांना सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या वधू वर व पालकांसाठी काही महत्वाच्या सूचना देखील आयोजकांकडून देण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे…..
वधू वरांसह पालकांनी उपस्थित रहावे.
वधू वरांचे पास पोर्ट साईज फोटो आधार कार्ड झेरॉक्स बायोडाटा झेरॉक्स सोबत आणावी
वधु वरांची माहिती भरण्यासाठी फॉर्म मेळाव्याच्या दिवशी जागेवरच मिळतील.
तसेच विदुर व घटस्पोटित वधुवरांची नोंदणी केली जाईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *