महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत गोळेगावात महिलांसाठी कार्यायल सुरू

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१६ ऑगस्ट २०२२

गोळेगाव


स्वातंत्र्यदिन आजादी का अमृत महोत्सव निमित्त जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत गोळेगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत श्री स्वामी समर्थ महिला ग्राम संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन गावच्या सरपंच सुनिता मोधे व उपसरपंच हर्षल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक उषा अभंग, प्रभाग समन्वयक मधुकर ठोंगीरे, सागर ठीकेकर, निर्मला गाढवे, रविंद्र आल्हाट, लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हणे, डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवाई, ग्रामसेवक आशिष कोल्हे व ग्राम संघाच्या अध्यक्ष सारिका कोकणे अध्यक्ष, सचिव, समूहातील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपस्थित महिलांना बी.एम.अभंग यांच्याकडून उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उमेद टीम कडून शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *