डिंभे उजवा कालवा तसेच घोड व मीना कालव्यांचे आवर्तन दि.२० जानेवारी पासून- कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

घोडेगाव – डिंभे उजवा कालवा तसेच घोड व मीना कालव्यांचे आवर्तन दि.२० जानेवारी पासून, कुकडी डावा कालवा दि.१ फेब्रवारी पासून व पिंपळगांव जोगे मधून दि.१० फेब्रुवारी पासून आर्वतन सोडण्याचा निर्णय तसेच घोड, मीना, कुकडी नदीवरील कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-यात आवश्यकते नुसार पाणी सोडण्याचा निर्णय पुणे येथे कुकडी व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती नियोजन बैठक झाला. कुकडी व घोड प्रकल्पातील कालवे व कोल्हापुर पध्दतीचे बंधारे दुरूस्ती तसेच नविन कामांसाठी निधीचे निजयोन याबैठकीत करण्यात आले.

हि बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपत्तीभवन येथे झाली. याबैठकीस राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कर्जतचे आमदार रोहितदादा पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे आमदार अशोक पवार, करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपुत, अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, एस.जे.माने हे उपस्थित होते.
याबैठकीत आर्वतन सोडण्याच्या निर्णया बरोबरच डिंभे डावा व उजवा कालवा व घोड कालवा पाणी गळती संदर्भात व घोड, मीना, कुकडी नदीवरील कोल्हापुर पध्दतीचे बंधारे दुरूस्ती तसेच नव्याने करावयाच्या कामांबाबत चर्चा झाली. यामध्ये डिंभे डावा कालवा दुरूस्तीसाठी २२.८५ कोटी, डिंभे उजवा कालवा २ कोटी, घोड शाखा कालवा ९ कोटी, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे १ कोटी व नविन अस्थीकरण व राहिलेल्या कामांसाठी १०० कोटी रूपयांची मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली.

डिंभे डावा कालवा दुरूस्तीसाठी मागणी केलेल्या निधी मधून प्रामुख्याने गळतीप्रतिबंधक व कालवे फुटण्याच्या ठिकाणची कामे होणार आहेत. तसेच घोड शाखेच्या कालव्यांसाठीच्या ९ कोटी मधून अस्थरीकरण व खोलखोदाईची काम होणार आहे. यामध्ये कळंब ते लौकी दरम्यान चांडोली, थोरांदळे, जाधववाडी, मांजरेवाडी येथील खोलखोदाईची कामे होणार आहेत. डिंभे उजव्या कालव्यां वरील धोकादायक झालेल्या मो-यांची दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार आहेत.

घोड नदीवरील खडकी पिंपळगांव, काठापुर येथील कोल्हापुर पध्दतीचे बंधारे, मीना नदीवरील नागापुरचा को.पं.बंधारा, कुकडी नदीवरील भाकरेवाडी, शरदवाडी, वडनेर, म्हसे खुर्द येथील को.प.बंधारे दुरूस्ती केली जाणार आहेत.

कुकडी व घोड प्रकल्पातील कालवे, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे दुरूस्तीसाठी १३० कोटी रूपयांची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे याबैठकीत केली. यापैकी तातडीने करावयाच्या विशेष दुरूस्तीसाठी ३० कोटी रूपये बिगर