रोहित खर्गे
विभागीय संपादक
आळंदी : दि १२ मार्च २०२१
येथील आळंदी नगरपरिषदेने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक विकसित करण्याचे कामास तात्काळ सुरुवात करावी अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे खजिनदार सुरेश नाना झोंबडे, सचिव सूर्यकांत खुडे यांनी केली आहे.
या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन च्या वतीने निवेदन देवून लक्ष वेधण्यात आले असल्याचे फाऊंडेशनचे खजिनदार सुरेश नाना झोंबडे यांनी संगितले आहे. आळंदी नगरपरिषदेने आळंदीत भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र या स्मारकाचे कामास विलंब झाला आहे. समाजात प्रशासनाचे कामकाजा बाबत नाराजी पसरली आहे. समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या असून वेळ प्रसंगी या स्मारकाचे कामासाठी तीव्र आंदोलन केले जाईल. सनदशीर मार्गाने स्मारकाचे काम तात्काळ सुरू न झाल्यास समाज बांधवाना बरोबर घेवून आंदोलन केले जाईल.
आळंदीतील स्मारकाचे नियोजित जागेत स्मारकाची जागा असा नामफलक तात्काळ लावून कामास गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून या बाबतचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने यापुढील काळात स्मारकाच्या विकासाला सूरुवात करण्याची मागणी करण्यात आली आहे. या स्मारकाचे विकास कामा बाबतची माहिती नागरिकांना प्रशासनाने खुली करून द्यावी. स्मारकाचे काम करण्यास मंजूर केलेला ठराव, स्मारकाच्या जागेचा तपशील, स्मारकाचा नकाशा, रेखांकन, स्मारकात अभ्यासिका, ग्रंथालय, सांस्कृतिक सभागृह होण्यासाठी तयार केलेला नकाशा सर्व सामान्य जनतेला पाहण्यास उपलब्द्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अनेक वर्षा पासून स्मारकाचा प्रश्न प्रलंबित असून यावर्षी या स्मारकाचे कामास प्राधान्याने सुरुवात होवून स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी पुणे जिल्हाधीकारी डॉ. राजेश देशमुख ,खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांना देखील निवेदन देवून मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.