लहान व्यक्तीवर मी बोलत नाही; शरद पवारांच्या विधानावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर

३१ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंभूराज देसाईंना खोचक टोला लगावला. शंभूराज देसाईंसारख्या लहान व्यक्तीवर मी बोलत नाही, असं विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या या विधानावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, होय मी त्यांच्यापेक्षा वयाने लहानच आहे. शरद पवार वयाने खूप मोठे आहेत. माझ्या वडिलांपेक्षा त्यांचं वय अधिक आहे. त्यामुळे त्यांना आम्ही लहानच वाटणार, पण ठीक आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. पवारांच्या आशीर्वादाने मला कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा समन्वयक मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ही संधी दिली. त्यामुळे आम्ही कामातून शरद पवारांना दाखवून देऊ की, लहान मुलगाही किती चांगलं काम करतो, हे मी शरद पवारांना नम्रतापूर्वक सांगत आहे अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *