उलगडल्या इटलीतील शैक्षणिक संधी!!!

उलगडल्या इटलीतील शैक्षणिक संधी!!

एस बी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये इटलीतील शैक्षणिक अभ्यासक्रमांवर मार्गदर्शन

पिंपरी पुणे (दि १७ जानेवारी २०२४) – इटली मध्ये जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, महाविद्यालये आहेत. युनि-इटालिया, डोमस अकादमी, बोकोनी, मारंगोनी, कतोलिका विद्यापीठ, नुओवा अकादमी या सहा शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी पीसीईटी शैक्षणिक समुहातील संस्थांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इटलीतील शैक्षणिक संधी, विविध अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती याविषयी मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस बी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर निगडी यांच्या वतीने आणि इटालियन दूतावासाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युनि-इटालियाच्या आसरा खान, पूजा दोडेजा, जोएल अल्फोन्सो – डोमस अकादमी, रिचा अग्रवाल – बोकोनी विद्यापीठ, राऊल डिसूझा – इन्स्टिट्यूटो मारंगोनी, काजल रजनी – (नाबा ) नुओवा अकादमिया डी बेले आर्टी, कतोलिका विद्यापीठाचे कृतार्थ हेंद्रे, एस बी पाटील आर्किटेक्चर कॉलेज प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्रा. आर्किटेक्ट निलिमा भिडे, प्रा. अभिषेक रांका, प्रा. बिजल वकाहरिया, प्रा. शिवा शिसोदिया, पीसीईटी – पीसीयुच्या युरोपियन स्टडीज सेंटर प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, एस बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ व्यवस्थापनाच्या संचालिका डॉ कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.

इटलीतील शैक्षणिक संस्थांमधून प्रामुख्याने फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डिझायनिंग, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, बिझनेस मॅनेजमेंट, फ्रेग्नंस ॲण्ड कॉस्मेटिक मॅनेजमेंट, डिजीटल फॅशन डिझायनिंग, एमबीए असे विविध प्रकारचे आणि भविष्यातील बदलांचा अभ्यास करून तयार केलेले अभ्यासक्रम शिकविले जातात. यामध्ये प्रमाणपत्र, पदविका, पदवी तसेच उच्च पदवी अभ्यासक्रम आहेत. कार्यानुभवासाठी विविध संस्था, कंपन्या आस्थापना यांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी, रोजगार संधी, संशोधन कार्यशाळा यामध्ये सहभाग घेतला जातो. विद्यार्थ्यांना गुणवत्ते नुसार प्रवेश, गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. याबरोबरच पासपोर्ट, व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते, आदी सविस्तर माहिती प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकांचे निरसन करण्यात आले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा. शिवा सिसोदिया यांनी केले. आभार डॉ ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *