दिवाळीच्या सुट्यांमध्ये एमआयडीसीत गस्तीसाठी पोलिसांची विशेष पथके

पिंपरी प्रतिनिधी
१३ ऑक्टोबर २०२२


दिवाळीच्या सुट्यांमध्ये एमआयडीसीत चोरी व गुन्हेगारीचे प्रकार घडतात . ते टाळण्यासाठी पोलिसांची विशेष गस्ती पथके नियुक्त करण्यात येणार आहेत , तसेच उद्योजकांचीही त्यासाठी मदत घेण्यात येणार आहे . पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. दिवाळीनिमित्त औद्योगिक आस्थापनांकडून सुटी जाहीर केले जाते . त्यानुसार यंदा २२ ते २७ या कालावधीत प्रकार घडतात . आक्टोबर कंपन्यांमधील कामकाज बंद राहणार आहे . त्यामुळे एमआयडीसीत चोरी व गुन्हेगारीचे कंपन्यांमधून स्क्रॅप , मशीन , कच्चा माल वाहने तसेच इतर साहित्य , वस्तू चोरून नेल्या जातात . त्यामुळे कंपन्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना उद्योजकांनी त्यांच्या कंपनीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच सुरक्षारक्षकदेखील नियुक्त करावेत . सुरक्षा भिंतीच्या दुरुस्तीसह ‘ अलार्म ‘ बसवणे , अशा सूचना उद्योजकांना करण्यात येत आहेत .पोलीस उपायुक्त साधणार संवाद पिंपरी चिंचवड , भोसरी , हिंजवडी , तळवडे , चाकण , तळेगाव येथील उद्योजकांशी पोलिसांकडून संवाद साधण्यात येणार आहे . त्यासाठी पोलीस उपायुक्त बैठक घेणार आहेत . विभागानुसार या बैठका होणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *