भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त आंबेगाव भूषण पुरस्काराचे वितरण भीमत्सवात सहभागी व्हावे गौतमराव खरात यांनी केले अहवान

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१३ एप्रिल २०२२

घोडेगाव


युगप्रवर्तक प्रतिष्ठाण आयोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी घोडेगाव ता आंबेगाव येथे भिमोत्सवाचे आयोजन राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिली गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे भीमजयंतीचा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपाचा झाला नव्हता त्यामुळे या वर्षी कोरोना संकट टळले असून शासनाने निर्बंध कमी केल्यामुळे तालुक्यातील घोडेगाव शहरात साजरी होणारी जयंती उत्साहात भव्यदिव्य साजरी होणार असून सकाळी बुद्धपुजा व प्रतिमा पूजन आणि ध्वजरोहन कार्यक्रम १० वाजता भन्ते विवेक व बौद्धचार्य पूनम दुधवडे यांच्या हस्ते होणार असून ११ वाजत ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे दुपारी ४ वाजता भव्य मिरवणूक ढोल ताशा,बेंजो,डीजे व पारंपरिक वाजंत्री यांच्या कडकडाटात चित्ररथ व शोभायात्रा घोडेगाव शहरातून काढण्यात येणार असून सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम शिवव्याख्याते डॉ श्रीमंत कोकाटे यांचे व्यख्यान होणार असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका गायत्री शेलार प्रस्तुत स्वरगंध ऑर्केस्ट्रा व भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांना आंबेगाव भूषण पुरस्कार वितरण करण्यात येणार असून या प्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील ,खासदार डॉ अमोल कोल्हे,अनु जमाती कल्याण कमिटीचे अध्यक्ष दौलत दरोडा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण च्या सदस्या पूर्वाताई वळसे पाटील त्याच प्रमाणे अध्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांची भूमिका साकारणारे सिनेअभिनेते मयुरेश महाजन व मुळशी पॅटर्न फेम सिने अभिनेता अमोल देवण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण} असणार आहेत तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य सभापती उपसभापतो सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी भीमसैनिक व भिमअनुयायी तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार असून आकर्षक सजावट भव्यदिव्य मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी आशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असून या कार्यक्रमाचे स्वागत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहत्सव समितीचे अध्यक्ष अमित रोकडे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश बोऱ्हाडे करणार असून सर्वांनी भीमत्सवात सहभागी व्हावे असे अहवान गौतमराव खरात यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *