सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण करू; किरीट सोमय्या यांना क्लिनचीट मिळताच राऊतांनी दिला इशारा

१५ डिसेंबर २०२२


भाजप नेते किरीट सोमय्या यांना  आयएनएस विक्रांत प्रकरणी क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सोमय्या यांना या प्रकरणात दिलासा कसा मिळाला? याची विचारणा करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहेत. तसेच सरकार बदलेल तेव्हा सगळ्यांचाच हिशोब पूर्ण करू, असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

सरकार बदलल्यावर अनेक गोष्टी होत असतात. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. विक्रांतसाठी पैसे गोळा झाले हे सर्वांनी पाहिलं. मग तो एक रुपया असेल किंवा ५० कोटी. पैशांचा अपहार झालेलाच आहे. अपहार हा अपहारच असतो. पैसे राजभवनात गेले म्हणतात. राजभवन म्हणते पैसे आलेच नाही. हाच सर्वात मोठा पुरावा आहे. जमा केलेले पैसे राजभवनात जमा केले असं म्हटलं गेलं. राजभवन म्हणतं एक रुपया आला नाही. यापेक्षा कोणता पुरावा असू शकतो? असे राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांना क्लिनचीट कशी दिली हे राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारा. आमच्या लोकांना क्लिनचीट मिळणार नाही. खरे तर  आयएनएस विक्रांत हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तो ईडीच्या अख्त्यारितील विषय आहे. ठिक आहे. आज क्लिनचीट मिळाली असेल. पण याचा अर्थ २०२४ ला हे प्रकरण समोर येणार नाही असं नाही. सरकार बदलेलं. कोणतंही सरकार कायमस्वरुपी नसतं. सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल. याविषयी मी फार काही बोलणार नाही. पण मी नक्कीच केंद्राला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *